'जनता कर्फ्यू' संपताच पुन्हा रस्त्यांवर गर्दी | Marathi News | आजच्या ठळक बातम्या | Sakal Media |

2021-04-28 122

नागपूर : दोन दिवसांच्या 'जनता कर्फ्यू' दरम्यान उपराजधानीत सर्वत्र शुकशुकाट जाणवला. कारवाईच्या भीतीने का होईना नागपूरकर आपापल्या घरांमध्येच बंदिस्त होते. मात्र कर्फ्यू संपताच पुन्हा नागपूरकरांनी रस्त्यांवर गर्दी केली. सोमवारी शहरात बहूतेक दुकाने बंद असली तरी, सगळीकडेच कमीअधिक प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. घराबाहेर पडलेले अनेक नागरिक 'सोशल डिस्टन्सिंग' नियमाचे उल्लंघन करताना दिसून आले. नागरिकांची अशीच वागणूक राहिल्यास शहरात नाईलाजाने पुन्हा कडक लॉकडाउन लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
(व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires